Monday, 30 July 2018

लेख क्रमांक 01 जीवनाची कुंजी दिनांक 29 जुलै 2018

*शिक्षण म्हणजे जीवनाची कुंजी*

समाजातील अज्ञानी, निरक्षर आणि अडाणी लोकांच्या बळावर काही व्यक्ती स्वतःची प्रगती साधून घेतात. हे करतांना त्या अज्ञानी, निरक्षर आणि अडाणी लोकांमध्ये सजगता येऊ नये असे नियोजन करतात. गावात अशी एक ही योजना येऊ देत नाहीत ज्यामुळे लोकांची प्रगती होईल किंवा त्यांना बरीच माहिती मिळू शकेल. ही माणसे अनभिज्ञ राहिली तरच आपले अस्तित्व टिकून राहू शकते, अश्याच गचाळ विचारसरणीमुळे आज भारत स्वातंत्र्य होऊन 70 वर्षाचा काळ लोटला तरी ही देशातील लोकांमध्ये किती प्रगती झाली. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांत झालेली प्रगती म्हणजे सर्वांची प्रगती नाही. माझ्या सोबतीचा विकास झाला पाहिजे ही भावना निर्माण होणे आवश्यक आहे. मागासलेला माणूस पुढे येऊ नये यासाठी किती ही आडकाठी टाकली तरी शिक्षण हे असे माध्यम आहे ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीचा विकास होऊ शकतो. नर का नारायण करण्याची शक्ती शिक्षणात आहे. म्हणून आपल्या लेकरांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करू या आणि एक समृद्ध भारत देश घडवू या.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक, धर्माबाद