तुझ्या प्रेमात एवढा
पागल झालो आहे की
पैसे नसुन ही ATM च्या
रांगेत तासनतास उभे राहिलो
- नासा येवतीकर
खास त्यांच्यासाठी ज्याना रांगेत उभे राहून ही पाच हजार रु. मिळाले नाहीत.
सेल्फी के जमाने में हम
कितने सेल्फी हो गये
पहिले मित्रों से तंबाखू
और चुना मांगते थे
अब हॉट-स्पॉट केजरिये
वाय-फाय मांगते है ।
दुकान में जाकर कभी
किताब नहीं खरेदी मगर
अब मोबाईल के जरिये
मुफ्त के pdf पढ़ रहे है
फोटो निकलवाने का शौक
बहुत पुराना मगर कभी
फोटो शोटो नहीं निकाले
अब हर एक लम्हे की
सेल्फी लेना नहीं भूलते है ।
- नासा येवतीकर
सहन किती करायचे ...?
अन्याय होतो फार
जुलुम नि अत्याचार
तोंड किती गप्प ठेवायचे
सहन किती करायचे ..?
मुलगी नको म्हणुनी
गर्भ किती वेळा पाडायाचे
मुलांसाठी सर्व प्रकार
सहन किती करायचे ..?
मुलगी आली लग्नाला की
हुंड्याचा प्रश्न सोडवायचे
हुंड्यासाठी मुलींचे बळी
सहन किती करायचे ..?
नोटाबंदीने पैसे मिळेना
किती दिवस त्रास सोसायचे
आज - उद्या करत पैश्यासाठी
सहन किती करायचे ..?
जीवनात कधी तरी मिळेल
सुख असे मन समजायचे
रोज रोज तेच रडगाणे
सहन किती करायचे ..?
- नासा येवतीकर, धर्माबाद
घरात असती लेकरे
घर गोकुळ वाटते
घरात नसते कोणी
तेंव्हा घर खायला उठते
- नासा येवतीकर
【 उन्हाळी सुट्टी मध्ये ज्याचे मंडळी आणि लेकरे गावी गेले असतील, त्यांची feeling असेच असेल नाही काय ? 】
No comments:
Post a Comment