Friday, 9 March 2018

सावित्री आणि प्रसार माध्यमे

सावित्री फुले आणि प्रसार माध्यमे

भारतात आज पुरुषांच्या बरोबरीने महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहेत.ज्यांनी महिलांना शिक्षण घेण्यास बंदी केली होती त्यांच्याच बायका मुली आज नाटक, चित्रपट आणि विविध वाहिन्यांच्या मालिकांमध्ये कथांद्वारे संस्कृती बहुजन समाजाच्या मनावर बिंबवण्याची जीवतोड मेहनत करताना दिसतात. एका बाजूला महिलांना मंगळवार, गुरुवार व संकष्टीचे कडक उपास तापास सांगणार व दुसर्‍या बाजूला डिजिटल मल्टिप्लेक्स कॅमेरा वापरून देवाधिकांचे चमत्कार दाखविणार. एका वाहिनीवर अशा मालिका प्रसिध्द होत आहेत. सावित्रीबाई फुले नसत्या तर या महिलांना आपले हे शिक्षण घेऊन कला कौशल्य दाखविता आले असते काय? अडाणी, अज्ञानी, अशिक्षित महिलांनी अंधर्शद्धेला बळी पडणे एक धर्माचे संस्कार म्हणून आपण समजू शकतो. परंतु सुशिक्षित महिलांनी या शिक्षणाची सावित्री हे समजून न घेणे किंवा माहिती असूनही तिचे उपकार न मानने हे एकूणच सर्व महिला वर्गाची सावित्रीबाई फुलेंच्या त्यागाची व कष्टाचे मोल न जाणण्यासारखे आहे. तिच्या शिक्षणाचा घोर अपमान म्हणजे काही मालिका आहेत.यामुळे महिलांची मान गर्वाने वर होते की त्यांच्या महिलांच्या चारित्र्याचे वस्त्रहरण होते? 
देशात महिलांना जो मानसन्मान मिळतो त्यांची जन्मदाती ही सावित्रीबाई फुले आहे. हैदराबादच्या रोहित वेमुला प्रकरण जगभर गाजले. मनुस्मृतीनुसार हा देश चालला असता, तर सांसद भवनात या स्मृर्ती इराणींचा प्रवेश होऊन एवढा मोठा अभिनय करता आला असता काय? ससंद भवन ह्लसत्य मेव जयतेह्व या ब्रीद वाक्याने चालते, पण मनुस्मृर्ती नुसार देश चालविणार्‍यांनी तो असत्ये मेव जयते नुसार चालविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते बुडाले. महिलांना जे काही सिद्ध करण्याची संधी मिळते ती केवळ सावित्रीमाई फुलेंच्या त्याग,जिद्ध आणि उद्धिष्ट असलेल्या मुक्तिदाती मुळे. त्यांची आठवण आज सुशिक्षित महिला विसरतात. 
महाराष्ट्रा राज्यात सातारा जिल्ह्य़ातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला.सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते ते गावचे पाटील होते. सवित्रीबाईचा विवाह १८४0 साली ज्योतिराव गोविंद फुले यांच्या बरोबर झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर ज्योतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती ज्योतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. त्यांनी ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला.जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्‍चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वत: शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.१ मे १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणा आऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाआऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी, १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. भारतातील व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा होती .(यापूर्वी मिशनर्‍यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. 
मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टुडन्ट्स लिटररी सायंटिफिक सोसायटीने ह्यकमळाबाई हायस्कूल नावाची मुलींची शाळा सुरू केली, ती शाळा आता ही चालू आहे. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपयर्ंत ही संख्या ४0-४५ पयर्ंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वणीर्यांनी ह्लधर्म बुडाला,जग बुडणार, असे केले. सनातन्यांनी त्यांना जीवतोड विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्‍वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही अनिष्ट रूढींना ही त्यांनी संघर्ष करून आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. रूढी पंरपराला विरोध अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या वासनाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करीत होता. जन्माला येणार्‍या मुलाला यातना शिवाय काहीच मिळत नव्हते, अशा अन्याय, अत्याचाराला वैतागून विधवा आत्महत्या करीत होत. भ्रूणहत्या मोठय़ा प्रमाणत घडविल्या जात होत्या.जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. ते सावित्रीबाईंनी सर्मथपणे चालविले. 
फसलेल्या आणि बलत्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्यानी बाळंतपण करून गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाईचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करून जगातील ऐतिहासी संप त्यांनी घडवून आणला, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न केले, अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी जिद्दीने संघर्ष करून पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९0) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सांभाळली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ह्यकाव्यफुले व ह्यबावनकशी सुबोध र%ाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.१८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कायार्चा आदर्श घालून दिला. १८९६-९७ मध्ये पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजाराने अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजना राबविली. यातून उद्भवणारे रुग्णांचे हाल पाहून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यात १0 मार्च १८९७ रोजी त्यांचे त्यात निधन झाले. आजच्या सृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. 
भांडुप, मुंबई.

     
     << Back to Headlines          Next >>

  All Rights Reserverd LOKSHAHI PUBLICATIONS PVT LTD 2017 March 10, 2018,Saturday Design and Developed by :                  

No comments:

Post a Comment