Thursday, 29 August 2019

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'फिट इंडिया' मोहिमेचा शुभारंभ; दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडला सोहळा

'फिट इंडिया' अभियानात उद्योग, चित्रपटसृष्टी आणि क्रीडाविश्वासह इतर क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या पार्श्वभूमीवर 'फिट इंडिया' अभियानाची सुरुवात केली. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजच्या दिवशी आपल्याला मेजर ध्यानचंद यांच्या रुपाने हॉकीचा जादूगर मिळाला होता. फिट इंडिया अभियान एक महत्वपूर्ण पाऊल आहे. मी क्रीडा मंत्रालय आणि युवा विभागाला शुभेच्छा देतो. बॉडी फिट तर माइंड हिट. फिटनेससाठीची गुंतवणूक ही शून्य आहे पण यामध्ये 100% रिटर्न मिळतो. तंदुरुस्त राहण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे हा त्यामागचा हेतू आहे. या अभियानात उद्योग, चित्रपटसृष्टी, खेळ विश्वासह इतर क्षेत्रातली अनेकांचा सहभाग आहे. पंतप्रधान मोदींनी नुकतेच 'मन की बात' कार्यक्रमात या अभियानाचा उल्लेख केला होता.
क्रीडा मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार, या अभियानाच्या पहिल्या वर्षात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीवर भर देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षी पौष्टिक अन्न आणि खाण्याच्या सवयीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या वर्षी टिकाऊ आणि पर्यावरण पुरक जीवनशैली स्वीकारण्यावर भर देण्यात येईल. चौथ्या वर्षी निरोगी जीवनशैलीच्या सवयी, आरोग्यासाठी अनुकूल गोष्टींना सवयीमध्ये समाविष्ट करण्यात लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. फिट इंडिया अभियानासाठी वेगळे सचिवालय तयार करण्याचा प्रस्ताव आहे.
तंदुरुस्त राहिल्याने सर्व गोष्टी परिपूर्ण होतात 
मोदी पुढे बोलताना म्हणाले की, फिटनेस एक जन आंदोलन व्हायला हवे. बॅडमिंटन, कुस्तीसह सर्व खेळांमध्ये आपले खेळाडू अपेक्षांना नवीन पंख देत आहेत. हा नवीन भारताच्या आत्मविश्वाचा एक उपाय आहे. खेळासाठी अधिक चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
फिटनेस हा एक शब्द नाही तर निरोगी आणि समृद्ध जीवनाची एक आवश्यकता आहे. आपल्या संस्कृतीत फिटनेसवर भर देण्यात आला आहे. आपल्या आयुष्याचा एक हिस्सा राहिला आहे. व्यायामाने स्वास्थ्य, दीर्घआयुष्य आणि सुख मिळत असल्याचे आपल्या पुर्वजांनी सांगितले होते. निरोगी राहिल्याने सर्व गोष्टी परिपूर्ण होतात पण आता स्वार्थाने सर्व कार्य पूर्ण होत असल्याचे ऐकायला मिळत आहे. म्हणूनच स्वार्थाच्या निरोगी भावनेसाठी काम करणे आवश्यक आहे.

पहिल्या महिन्यात वॉकथान, सायकल आणि तपासणी शिबीराने होईल सुरुवात 
प्रस्तावानुसार, अभियानाच्या पहिल्या महिन्यात देशातील सर्व शिक्षण संस्थानांमध्ये क्रीडा प्रतिभेसह वॉकथान सायकल रॅली आयोजित करण्यात येणार आहे. सोबतच तपासणी शिबीर उभारण्यात येईल. दुसऱ्या महिन्यात गाव आणि जिल्ह्यातील शाळा आणि विद्यापीठ स्तरावर खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होणे गरजेचे असेल. तिसऱ्या महिन्यात सोशल मीडियाद्वारे फिटनेस क्लब तयार करण्यासाठी प्रेरित करण्यात येईल. जेणेकरून दर आठवड्याला परिवार आणि मित्रांना या अभियानात सहभागी करता येईल. चौथ्या महिन्यात क्रीडा मैदाने तयार करण्यात येतील.

Sunday, 25 August 2019

माझा फळा - माझी लेखणी

माझा फळा - माझी लेखणी उपक्रम राबविलेल्या शाळांच्या उपक्रमशील शिक्षकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया.

Togarwad Nanded
माझा फळा माझी लेखणी हा खेळ सुंदर आहे मुलांच्या बुद्धिला चांलना देणारा आहे त्यांच्या प्रगतीला पोषक आहे 🙏🙏

+91 96574 68867:
उपक्रम खूप छान.मुल स्वत:हून विचारतात मँडम आज कोणत नाव लिहायचय .

+91 82370 60639
या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमधील कल्पकता दिसून येते त्यांच्यातिल सुप्तगुणांना आपण थोडी चालना देतो याची जाणीव होते खरच खूप छान अनुभव आहे

+91 94035 40037
या उपक्रमा मुळे मुलांच हस्ताक्षर पण सुंदर होईल..कारण पहिल्या दिवशी स्वत:चे नाव लिहले तेवडं अक्षर चांगल आले नाही..परंतू त्यांना एक सांगीतल ज्याचं अक्षर सगळ्यात छान येईल ..त्याला पेन बक्षिस.. आपल्याला हा उपक्रम रोजच घ्यायचाय वेगवेगळी नावं असतील..चिञ असतील...मुलं अक्षर सुंदर काढण्याचा चांगला प्रयत्न करु लागलेत...अक्षर नक्कीच मुलांच या उपक्रमामुळे छान होईल. आणि यामुळे वाचनाचाही सराव..🙏

+91 99759 77676
21 तारखेला मुलांनी बाबांचे नाव लिहिले बऱ्याच विद्यार्थ्यांना बाबा म्हणजे आजोबा वाटले एकमेकांना त्यांनी त्यांच्या आजोबा बद्दल माहिती सांगितली काही जण माझे आजोबा मिल्ट्री मॅन होते असे सांगत होते तेव्हा ते खूप संवेदनशील झाले

+91 98506 36908
मुले खरच जाणीवपूर्वक माझे अक्षर चांगले कसे येईल याचा प्रयत्न करताना दिसतात. यामुळे शुद्धलेखनही नक्कीच चांगले होईल. उपयुक्त उपक्रम आहे.

Yangndewar Madam
मुलांना फलक लेखन करायची खूप आवड असते.म्हणून मुले उत्साहीत होत आहेत फलक लेखन करण्यासाठी..वर्गात गेल्या बरोबर विचारत आहेत कि आजपण लिहायला लावणार?खूप छान प्रतिसाद मिळत आहे.ना.सा.सर उपक्रम छान👌👌

माझा फळा - माझी लेखणी या उपक्रमाचा जन्म एका अपघातातून झाला. माझ्या वर्गातील एक विद्यार्थी रडत रडत माझ्याजवळ आला आणि म्हणाला " सर, तो सुरेश आहे ना, माझे नाव एका कागदावर लिहिला " यावर मी म्हटलो, " त्यात काय एवढं, तुझं नाव लिहिलं तर बिघडलं कुठं, तुझ्या नावाचे अनेकजण असतात." पण तो ऐकायला तयार नव्हता, त्याची इच्छा होती की, मी त्याला रागवावे. त्याप्रमाणे मी त्याला रागावलो आणि जागेवर बसायला सांगितलं. थोड्या वेळाने मी याविषयी विचार केला की, मुलांना अभ्यासाच्या व्यतिरिक्त लिहायला खूप आवडतं. मग मुलांना फळ्यावर लिहायला तर खूपच आवडते. त्यादिवशी एक प्रयोग म्हणून मुलांना फळ्यावर स्वतःचे नाव लिहायला सांगितलं, मग काय सर्व मुलांनी अगदी उत्स्फूर्तपणे फळ्यावर नाव लिहायला पुढे आली. मग त्यांना सांगितलं की, तुम्हाला रोज फळ्यावर लिहायचं आहे, त्यामुळे असे कुणाचे नाव कुठे ही लिहीत जाऊ नका. सुंदर अक्षर आणि अचूक शब्द लिहा.
खरोखरच मुलांना खूप आनंद वाटला आणि रोज नवीन विषय दिल्यामुळे मुले उत्सुकतेने लिहिण्याची वाट पाहू लागले.

नासा येवतीकर
जि प प्रा शाळा चिरली

+91 73507 21277
*माझा फळा माझी लेखणी*
हा उपक्रम अतिशय सुंदर आहे.या उपक्रमाला जास्त तयारी करावी लागत नाही.अतिशय सोप्या पध्दतीने व उपयुक्तपणे हा उपक्रम आहे.लेखनाला कंटाळा करणारी मुले आनंदाने लेखन करू लागली.अक्षरे छान येण्यासाठी लेखन सराव करू लागली.लेखनातील चूका आपण न सांगता त्यांनाच समजून येऊ लागल्या.मस्तच प्रतिसाद आहे.

साविता बारंगळे जि.प.शाळा धनवडेवाडी सातारा

*माझा फळा माझी लेखणी*
ना सा सर म्हणजे त्यांच्या नावातच नाविन्यपूर्ण साहित्यिक त्यांच्याजवळ आहे.खरोखरच हा उपक्रम अतिशय सुंदर आहे. सर फळा म्हणजे प्रत्येक बालकास लावीते लळा. या उक्तीप्रमाणे फळ्यावर प्रत्येक बालकास लिहिण्यास आवडते कारण आपण जेव्हा शालेय जीवनात असताना कोणी फळ्यावर लिहले तर आपल्यावर गुरुजी रागवायचे.आणि एका बंदिस्त असायचो कारण वर्गात कोणी बोलेल त्यांचाच फळ्यावर लिहायचे परंतु त्यातून कोणतेही उद्दीष्ट साध्य होत नव्हते .परंतु आजची परिस्थिती बदलली आहे.कारण आजचा गुरुजी आपापल्या परीने असो किंवा माझा फळा माझी लेखणी या उपक्रमातून शिक्षण यातून प्रत्येक शिक्षकास प्रेरणा मिळत आहे.आजचा विद्यार्थी अभिमानाने आपल्या नवीन नवीन  परिचित गोष्टी लिहू लागला.या उपक्रमातून वळणदार अक्षरे व कानामात्रा चुका व दुरुस्त एकमेकांना कळू लागल्या व लगेच सुधारणा लक्षात येऊ लागले.या उपक्रमातून शुद्धलेखनात सुधारणा होऊ लागलेत सर आजपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे पुढे सुध्दा हा उपक्रम अखंड चालू राहावा हीच अपेक्षा ठेवतो व या उपक्रमास शुभेच्छा देतो.
*आपलाच एक बांधव*
*संतोष वाघमारे*
*जि.प.प्रा.शाळा बाचेगाव ता.धर्माबाद जि.नांदेड*

Ambatwad NV
माझा फळा माझी लेखणी हा उपक्रम अतिशय चांगला आहे कारण या उपक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना विशेष तयारी किंवा  खर्च करावा लागत नाही .लेखनातील स्वतःच्या चुका स्वतः दुरुस्त करतांना मुले दिसतात व चुक दुरूस्त झाल्यानंतर त्यांचा आनंद पाहण्यासारखा असतो.

+91 96374 60738
माझा फळा माझी लेखणी
हा उपक्रम खूप छान आहे. विद्यार्थ्यांना फळ्यावर लिहायला आवडते. रोज लिहायला मिळाल्याने लिहिण्यात सुधारणा होतात. रोज विद्यार्थी वाट बघतात आज काय लिहायचे आहे. लिहिल्यानंतर त्याचे वाचन करतात. लेखन वाचन दोन्ही क्रिया आनंदाने करतात. उपक्रम खूप छान आहे.
Dakshata borkar
जी. प. शाळा. Patharai ता. रामटेक. जी. नागपूर

Kalpna Madewar
माझा फळा माझी लेखणी हा छान उपक्रम आहे.मला विद्यार्थींकडून छान प्रतिसाद मिळत आहे.प्रत्येक मुलाला संधी असल्यामुळे विद्यार्थी खूप खूष आहेत.

+91 94035 43109
माझा फळा माझी लेखणी हा उपक्रम स्तुत्य आहे. ज्ञानरचनावाद उपक्रमास पूरक आहे.उत्स्फूर्त स्वयंलेखन विकासासाठी अभिरुची निर्माण करणाराआहे👌🌹👍

+91 95522 73717
"माझा फळा, माझी लेखणी " याउपक्रमाच्या नावातच  आपलेपणा आहे. मुलांना लिहायला खुपच आवडते .रोज नवीन विषयाची उत्सुकता असते. मला देखील हा विषय खूप आवडला. 👌🙏
श्रीमती. सीमा ज्ञानेश्वर जगदाळे...जि. प. शाळा धुरखेड. ता. शहादा जि. नंदुरबार

*'माझा फळा- माझी लेखणी*
हा उपक्रम मागील आठवड्यात मी माझ्या शाळेवर राबविला.विद्यार्थी दररोज उपक्रमाची आतुरतेन वाट पाहत असत.विद्यार्थ्याना अभिव्यक्तीची संधी उपक्रमाच्या माध्यमातून मिळाली.प्रत्येक विद्यार्थी उपक्रमात हिरीरीने सहभागी होत होता.सर्वांना समान संधी मिळाली.फळ्यावर लिहल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर असिम आनंद आढळला.
  त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.उपक्रम सुरु केल्याबद्दल ना.सा.सरांचे मन:पूर्वक आभार.

🙏साईनाथ कामिनवार🙏
          सहशिक्षक
जि.प.प्रा.शा.पाटोदा बु ता.धर्माबाद जि.नांदेड

+91 99231 00360
वसंतराव वैदय विदयालय प्राथमिक शाळा सेनादत्त पेठ पुणे 30
वैशाली सर्जेराव

परिक्षा असली तरी पेपर झाला आता फळयावर लिहियच ना इतकी उत्सुकता मुलांमधे दिसली यावरूनच मुलांना उपक्रम मनापासून आवडतोय व लेखनाची गोडी वाढतेय हे ही दिसून येते 🙏

धन्यवाद ..........!

Saturday, 24 August 2019

चित्त शुद्धीचे शिक्षण

चित्तशुध्दीच्या शिक्षणाची आज नितांत गरज

- डॉ. दत्ता कोहिनकर

 कुटूंबातील आई-वडिलांनी उपाशी राहून आपल्या दोन मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलही अभ्यासात हुशार..  दोघांनी शिक्षण घेऊन अमेरिकेत उच्च पदावर नोकरी मिळवली. अमेरिकेत आपले मजबूत बस्तान बसवले. दोघांनीही अमेरिकन मुलीशी लग्न करून तेथेच संसार थाटला, आता त्यांचे भारतात येणं दुर्मिळ झालं.  अशातच आई गेल्याची वार्ता दोघांनाही पोहचली. धाकटा मुलगा उशीरा, सर्व सोपस्कार झाल्यावर गावी पोहचला. दोन दिवस थांबून त्याने वडलांच्या हातावर एक लाख रूपये ठेवले व त्यानंतर म्हणाला ह्यह्यबाबा मी निघतोय, आज रात्रीची फ्लाईट आहे. 
 दुःखी कष्टी बाबा न राहवून बोलले, अरे तू आलास पण तुझा दादा ? त्यावेळेस तो मुलगा म्हणाला, ह्यह्यत्याचं काय आहे बाबा, मी दादाला फोन केला होता, मात्र वर्कलोड जास्त असल्याने त्याला येणे शक्य नव्हते.ह्णह्ण तोच म्हणाला, ह्यह्ययावेळी तू जा-बाबांच्या वेळी मी जाईन.ह्णह्ण बाबा आतल्या आत उन्मळून पडले. डोळयांतून अश्रुच्या धारा वाहू लागल्या. उच्चशिक्षण मी दोनही मुलांना देऊ शकलो पण कर्तव्य व माणूसकीचे अर्थात नैतिक मूल्यांचे शिक्षण मी त्यांना देऊ शकलो नाही या विचारांनी त्यांचे अंतःकरण उव्दीग्न झाले. 
 पूर्वी लोक कमी शिकलेली होती. वाडयात एका घरात एखादी व्यक्ती देवाघरी गेली (मयत झाली) तर सगळया वाडयात सुतक असायचे. कोणीही आपल्या घरात रेडिओ देखील लावत नसत. ज्या घरात मयत झाली त्या घरातील लोकांना शेजारी-पाजारी, न्याहारी, भोजन आणून खावयास लावत व मयताच्या सगळया विधीमध्ये वाडयातील लोकांचा सहभाग असे. वाडा हेच एक कुटूंब असतं. आज लोक खूपच शिकतात. पण खालच्या मजल्यावर मयत झाली असेल तर चौथ्या मजल्यावर दार बंद करून श्रीखंड - पुरीचे जेवण चाललेले असते. दुःख सावरायला येणार कोण ? दरवाज्यावर मोठमोठया पदव्या असतात पण दरवाजे आतूनच बंद असतात. बिल्डींगमधील लोकांची नावे पण बर्‍याच जणांना माहीत नसतात, असे शिक्षण काय कामाचे ? 
 आज मुलांना चारित्र्य घडवणारे व मानसिक बल वाढवून, बुद्धी विशाल करणारे, नैतिक मूल्य जोपासणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. ज्यामुळे करूणा - मैत्री - मुदीता - उपेक्षा - निःस्वार्थ वृत्ती उदयास येते असे शिक्षण आज लुप्त झाले आहे. 
 माणसाच्या मनात दुसर्‍याविषयी आदर -सेवाभाव - मैत्री निर्माण करून माणसाने - माणसाशी - माणसाप्रमाणे वागण्याच्या शिक्षणाची आजच्या पिढीला गरज आहे. कृतज्ञता जागवणारे शिक्षण आज दिले गेले पाहिजे. 
 एक तारखेला पगार घेणे व आयुष्यभर दाराला आतुन कडी लावून घेणे, रस्त्यावर कोणी चक्कर येऊन पडला तरी मला काय घेणे आहे,  या विचारसरणीचे उच्चाटन करणारे शिक्षण आजच्या शाळेत शिकवायला हवे. कर्मवीर भाऊराव  पाटील मुलांना झोपडी बांधायला शिकवत, स्वयंपाक करायला, शब्दकोश पाहायला शिकवत, रविंद्रनाथ टागोर विदयार्थ्यांना नमह्यपणे सर्व प्रकारची कामे करायला शिकवत. इंदिरा गांधीना टागोरांच्या संस्थेत पाठवताना नेहरूंनी टागोरांना कळवले होते,तिला हाताने काम करू दया, डोळयाने जग पाहू दया मनाने विचार करू दया. माझी मुलगी म्हणून कुठल्याही प्रकारची सवलत तिला देऊ नका.
 अब्राहम लिंकनने मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला होता, माझ्या मुलाला जगात कसं जगायचं व विषम परिस्थितीत कस वागायचं हे शिकवा असा आग्रह केला होता. 
 आज जास्त शिकलेली लोक भौतिक जगात अन्यायाविरूध्द दंड थोपटण्यास पुढे येत नाहीत. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे  - ते जो पिईन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
 म्हणून निस्वार्थता, सेवाभाव, चारित्र्य, नैतिकता, संघभावना, देशप्रेम, शुध्दता,कर्तव्यभावना, करूणा, मैत्री, कृतज्ञता यांचे संमिश्र शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी चित्त शुध्द करा.मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास। कठीण वज्रास भेदू ऐसे॥ असे स्वाभिमानपूर्वक सांगणारे तुकाराम महाराज देखील आवाहन करतात, सकळांच्या पाया माझे दंडवत । आपले चित्त शुध्द करा या चित्तशुध्दीच्या शिक्षणाची आज नितांत गरज आहे

Monday, 19 August 2019

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र
--------------------------------------------------
प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधूचरित, पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही,मला माहित आहे !सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,घाम गाळून कमावलेला एकच छदाम,आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवाआणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला,तुमच्यात शक्ती असती तर .........त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवाआणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.गुंडांना भीत जावू नको म्हणावं,त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.जमेल तेवढं दाखवित चला त्याला,ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.मात्र त्याबरोबरच,मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला,पाहू दे त्याला,पक्षांची अस्मान भरारी ............सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......शाळेत त्याला हा धडा मिळू दे,फसवून मिळालेल्या यशापेक्षा,सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .आपल्या कल्पना, आपले विचार,यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने,बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी,त्याला सांगा ................भल्याशी भलाईनं वागावं,आणि टग्यांना अद्दल घडवावी .माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी,पुढे हेही सांगा त्याला,ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून,आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,हसत रहावं उरातल दुःख दाबून,आणि म्हणावं त्यालाआसवांची लाज वाटू देऊ नको.त्याला शिकवा .........तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला,अन चाटुगिरीपासून सावध रहायला.त्याला हे पुरेपूर समजवा की,करावी कमाल कमाई त्याने,ताकद आणि अक्कल विकून,पण कधीही विक्रय करू नये,हृदयाचा आणि आत्म्याचा.धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,कानाडोळा करायला शिकवा त्याला.आणि ठसवा त्याच्या मनावर,जे सत्य आणि न्याय वाटते,त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.त्याला ममतेनं वागवा,पण, लाडावून ठेवू नका.आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवायलोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,अन धरला पाहिजे धीर त्याने,जर गाजवायच असेल शौर्य .आणखीही एक सांगत रहा त्याला ..........आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,माफ करा गुरुजी,मी फार बोलतो आहेखूप काही मागतो आहे.........पण पहा........जमेल तेवढ अवश्य कराच,माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो !!!

- अब्राहम लिंकन

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र
--------------------------------------------------
प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधूचरित, पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही,मला माहित आहे !सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,घाम गाळून कमावलेला एकच छदाम,आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवाआणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला,तुमच्यात शक्ती असती तर .........त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवाआणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.गुंडांना भीत जावू नको म्हणावं,त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.जमेल तेवढं दाखवित चला त्याला,ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.मात्र त्याबरोबरच,मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला,पाहू दे त्याला,पक्षांची अस्मान भरारी ............सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......शाळेत त्याला हा धडा मिळू दे,फसवून मिळालेल्या यशापेक्षा,सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .आपल्या कल्पना, आपले विचार,यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने,बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी,त्याला सांगा ................भल्याशी भलाईनं वागावं,आणि टग्यांना अद्दल घडवावी .माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी,पुढे हेही सांगा त्याला,ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून,आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,हसत रहावं उरातल दुःख दाबून,आणि म्हणावं त्यालाआसवांची लाज वाटू देऊ नको.त्याला शिकवा .........तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला,अन चाटुगिरीपासून सावध रहायला.त्याला हे पुरेपूर समजवा की,करावी कमाल कमाई त्याने,ताकद आणि अक्कल विकून,पण कधीही विक्रय करू नये,हृदयाचा आणि आत्म्याचा.धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,कानाडोळा करायला शिकवा त्याला.आणि ठसवा त्याच्या मनावर,जे सत्य आणि न्याय वाटते,त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.त्याला ममतेनं वागवा,पण, लाडावून ठेवू नका.आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवायलोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,अन धरला पाहिजे धीर त्याने,जर गाजवायच असेल शौर्य .आणखीही एक सांगत रहा त्याला ..........आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,माफ करा गुरुजी,मी फार बोलतो आहेखूप काही मागतो आहे.........पण पहा........जमेल तेवढ अवश्य कराच,माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो !!!

- अब्राहम लिंकन

Tuesday, 13 August 2019

डॉ विठ्ठलराव विखे पाटील जयंती विशेष


सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक.
*पदमश्री सहकारमहर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती निमित्ताने प्रासंगिक लेख*

विठ्ठलराव एकनाथराव विखे-पाटील : (१२ ऑगस्ट १८९७−२७ एप्रिल १९८०). महाराष्ट्रतील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक (ता. श्रीरामपूर) या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्म. लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण. नंतर त्यांनी लहान वयातच शेतीला सुरुवात केली. त्याकाळी शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते, हे नेमके हेरून त्यांनी व्हवहारबुद्धी, चातुर्य व काटकसरीने शेती केली. १९२३ मध्ये ‘लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी’ ची स्थापना करून ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळले. त्यांनी जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले, तसेच गावातील पाथरवट-वडार मंडळींना एकत्र आणून ‘मजूर सहकारी सोसायटी’ची स्थापना केली.
इंग्रज सरकारने मुंबई कौन्सिलमध्ये ‘तुकडे बंदी आणि तुकडे जोड’ हे विधेयक आणले, या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे सावकाऱ्यांच्या घशात जाऊन ते जमिनीला मुकणार होते. अशा वेळी इस्लामपूर येथे शाहू महाराजांनी घेतलेल्या शेतकरी परिषदेला विखे−पाटील नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसह गेले व तेथे हजारो शेतकऱ्यापुढे भाषण देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यातूनच त्यांच्या शेतकरी नेतृत्वाचा जन्म झाला.
पुढे महाराष्ट्राच्या एक लाख शेतकऱ्यांनी याच प्रश्नासाठी पुण्याच्या कौन्सिल हॉलला वेढा घातला, त्यात विखे−पाटील आघाडीवर, त्यात विखे−पाटील आघाडीवर होते. त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या दैन्यावस्थेची जाणीव करून देऊन, संघटित होण्याचे व त्यातून व्यक्तिगत व सामुदायिक विकास साधण्याचे महत्त्व पटवून दिले. विखे−पाटील यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा व डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता.प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर रोड (श्रीरामपूर) येथे १९४५ मध्ये पार पडलेल्या ‘द डेक्कन कॅनॉल्स बागायतदार परिषदेत विखे-पाटील’ यांनी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी पद्धतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव मांडला.या परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी व उपस्थित शेतकऱ्यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणूक विखे-पाटील यांच्यावरच जबाबदारी टाकली. त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी १९४५ ते १९५० या कालखंडात अतोनात कष्ट घेऊन, गावोगावी व दारोदारी भटकंती करून भागभांडवल जमविले, तसेच कारखान्याला शासनाकडून मंजूरी मिळविली. कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या भटकंतीकरिता शेतकऱ्यांचा एकही पैसा खर्च केला नाही. ‘परान्न घेणार नाही’ अशी त्यांची प्रतिज्ञा होती, त्यामुळे आपली भाकरी ते नेहमी आपल्या कोटाच्या खिशात बाळगीत असत. विखे−पाटील यांची साखर कारखाना काढण्याची कल्पना त्यावेळी हास्यास्पद ठरविली गेली.
अशा सर्वस्वी प्रतिकूल परिस्थीतीला तोंड देत विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांच्या पहिल्या ‘प्रवरा सहकारी कारखान्या’ची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली आणि या कारखान्यातून साखर उत्पादन सुरू झाले. त्यावेळचे मुंबई राज्याचे वित्त व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी या कारखान्यास शासनाची मान्यता मिळवून देऊन सर्वतोपरीने सहकार्य केले. प्रवरानगराचा हा कारखाना आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील अग्रगण्य साखर कारखाना मानला जातो.
पहिली अकरा वर्षे विखे−पाटील यांच्या आग्रहामुळेच डॉ. धनंजयराव गाडगीळ कारखान्याचे अध्यक्ष झाले. तर ते स्वतः उपाध्यक्ष म्हणून काम पहात असत. पुढे ते ‘विखे−पाटील प्रवरा सहकारी साखर कारखान्या’चे अध्यक्ष (१९६०) व ‘संगमनेर सहकारी साखर कारखान्या’चे मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष (१९६६) झाले.
शेतकऱ्यांच्या सहकारी साखर कारखान्यांची योजना विखे−पाटील यांनी यशस्वी रीत्या राबविल्यामुळे भारत सरकारने त्याचा लाभ आणि माहिती भारतातील विविध प्रतिनिधी आणि अभ्यासू शेतकरी यांना व्हावी, म्हणून अखिल भारतीय सहकारी साखर कारखान्यांची पहिली परिषद १९५६ साली प्रवरानगर येथे भरविली.
प्रवरानगरचा सहकारी साखर कारखाना व विखे−पाटील हे भारतातील सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान बनले. अशा प्रकारचे आणखी कारखाने उभे राहण्यासाठी विखे−पाटील यांनी अनेक शेतकरी नेत्यांनी प्रोत्साहन दिले. उदा., सांगलीचे वसंतदादा पाटील, वारणानगरचे तात्यासाहेब कोरे, पोहेगावचे गणपतराव ओंताडे, राहुरीचे वाबूराब तनपुरे, अकलूजचे शंकरराव मोहिते, पंचगंगेचे रत्नाप्पा कुंभार, परभणीचे शिवाजीराव देशमुख, इत्यादी. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः प्रवरानगरला येऊन विखे-पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली (१५ मे १९६१).
विखे−पाटील यांनी शेतकऱ्यांना बचतीचे महत्त्वही पटवून दिले. शासनाची अल्पबचत योजना यशस्वी रीत्या राबविल्याबद्दल १९६५ मद्ये भारताचे तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांनी खास मानपत्र देऊन गौरविले. त्याचप्रमाणे कुटुंबनियोजनाची योजनाही १९५९ पासून त्यांनी परिसरात राबविली. या योजनेचे फलित म्हणजे, १९७६ साली ऑक्टोंबर महिन्यात प्रवरा हॉस्पिटलमध्ये चार दिवस भरविलेल्या कुटुंबनियोजन शिबिरात ६,२३१ शस्त्रक्रिया यशस्वी रीत्या पूर्ण करण्यात आल्या व त्यातून शस्त्रक्रियांचा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला.
विखे−पाटील यांनी पुढील सामाजिक. शैक्षणिक संस्थांवर विविध नात्यांनी काम केले : प्रवरा शिक्षणोत्तेजक सहकारी पतपेढीचे संस्थापक व अध्यक्ष (१९५३), अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष (१९५३−५६), कोपरगाव व कारेगाव सह. साखर कारख्यान्यांचे सन्मानीय संचालक (१९५४), प्रवरा ग्रामीण शिक्षणसंस्थेचे आद्य प्रवर्तक (१९६४), साखर कामगार हॉस्पिटलचे (श्रीरामपूर) अध्यक्ष (१९६८), अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक (१९५८) व अध्यक्ष (१९६८), गोदावरी विकास मंडळाचे सदस्य (१९७१) इत्यादी.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याने ते प्रभावित झाले व त्यांनी कर्मवीरांना नगर जिल्ह्यात शैक्षणिक संस्था उभारण्यास पाचारण केले. तसेच सर्वतोपरीने साहाय्य केले. विखे−पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष (१९७८) होते. ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सुटावेत; म्हणून त्यांनी ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ ची स्थापना (१९७४) करून अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केले. त्यांच्या पश्चात् त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या माध्यमांतून अनेक शिक्षणसंस्था-उदा., वैद्यकीय, दंत, परिचालिका, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन (मुलांचे व मुलींचे), औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कला अकादमी तसेच गावोगावी अनेक माध्यमिक विद्यालये इ. संस्था उभ्या राहिल्या. त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखे−पाटील व नातू राधाकृष्ण विखे-पाटील यांनी समर्थपणे पुढे चालविले आहे.
विखे−पाटील यांनी सहकार, कृषी, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रांत केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना १९६१ मध्ये ‘पद्मश्री’ हा किताब दिला, तर पुणे विद्यापीठाने ‘डी. लिट्.’ (१९७८) व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (१९७९) या पदव्या प्रदान केल्या. लोणी बुद्रुक येथे त्याचे निधन झाले. 
लेख आवडल्यास पुढे पाठवा व प्रतिक्रिया जरूर कळवा 

संकलन :- रवी ढगे
मराठा सेवा संघ, नांदेड 9049931555