शिवणी ता. देगलूर येथे शालेय गणवेश वाटप
आज दि.05/08/2019 रोजी जि.प.प्रा.शा.शिवणी येथे पवित्र श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी सणानिमित्त विद्यार्थ्यांना शै.वर्ष 2019-20 अंतर्गत शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शा.व्य.स.अध्यक्ष श्रीमान लक्ष्मण आलुरे,प्रमुख अतिथी म्हणून शिवणी गावचे सरपंच तथा माजी पं.स.सदस्य श्री रमेशदादा सोनकांबळे,शिवणी शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक मु.अ.श्री जाधव हनमंत सर, उप.सरपंच श्री बसवंत जक्कावार,तं.मु.अध्यक्ष श्री वीरभद्र पाटील,श्री मोगावर शिवराज सर,श्री उमाकांत बुक्कावार,श्री सतीश वाघमारे,डॉ.सदानंद मंदाडे आणि समस्त शिक्षणप्रिय गावकरी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कौतुकास्पद गोष्ट म्हणजे अशी की,सर्व शिक्षा अभियान अंतर्गत एकूण 179 विद्यर्थ्यांपैकी सर्व मुली आणि अनु.जाती.,अनु.जमाती,बी.पी.एल.मुले असे एकूण 129 मुले यांनाच दोन गणवेश असताना शाळेचे मु.अ.श्री जाधव हणमंत सर आणि शा.व्य.स.अध्यक्ष यांच्या निस्वार्थी त्यागामुळे खुल्या आणि N.T. प्रवर्गातील सरसकट 50 मुलांना दोन दोन गणवेश प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक यांचेकडे लग्नातील आहेराप्रमाणे त्यांच्या मांडीवर ठेवून देण्यात आले.त्यामुळे खुल्या आणि NT प्रवर्गातील गरीब व आर्थिकदृष्ट्या अक्षम विद्यार्थ्यांना खरा न्याय आणि मोठा आधार मिळाला आहे.
तसेच एकीकडे समाजातील सण आणि उत्सव नाहीसे होत चालले असताना त्या सणांना नवसंजीवनी देण्याचे काम शाळेतील सर्व शिक्षक आणि उत्साही विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्यात आले.समस्त गावकरी आणि मान्यवरांच्या समक्ष शाळेतील सर्वच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पंचमीची "भुलई"खेळली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मु.अ.श्री जाधव सरांनी केले.तर सूत्रसंचालन श्री विश्वनाथ पाटील सर यांनी केले.आभार श्री जनार्दन जाधव सर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गंगाधर द्याडे सर,श्री इररेड्डी मंदाडे सर,श्री जाकेरपाशा मरखेलकर सर,श्री प्रमोद रावणगावे सर आणि श्री भोसले तानाजी सर यांनी विशेष प्रयत्न केले.
शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपल्याचे घोषित करण्यात आले.
*शब्दांकन=श्री भोसले तानाजी नि.(स.शि.प्रा. शा.शिवणी कें.होट्टल ता.देगलूर)*.

No comments:
Post a Comment