Friday, 15 May 2020

viramchinhe

इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी

*Work From Home मराठी*

*विरामचिन्हांची ओळख*

०१) पूर्णविराम ( . ) - वाक्य पूर्ण झाले हे दर्शविते.

०२) अर्धविराम ( ; ) - दोन छोटी वाक्ये उभयान्वयी  अव्ययांनी जोडतात तेंव्हा हे वापरले जाते.

०३) स्वल्पविराम ( , ) - एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात.

०४) अपूर्णविराम ( : ) - वाक्याचा शेवटी तपशील देताना वापरतात. 

०५) प्रश्नचिन्ह ( ? ) - वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याचा शेवटी वापरतात. 

०६) उदगारचिन्ह ( ! ) - मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या / वाक्याचा शेवटी वापरतात. 

०७) अवतरण चिन्ह एकेरी ( '  ' ) - एखाद्या शब्दावर जोर देतांना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात. 

०८) अवतरण चिन्ह दुहेरी ( "  " ) - बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात. 

०९) संयोगचिन्ह ( - ) - दोन शब्द जोडताना वापरतात. 
ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास वापरतात. 

१०) अपसारण चिन्ह डॅश ( _ ) - बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास वापरतात. 
स्पष्टीकरण द्यायचे असल्यास वापरतात. 

वरील विरामचिन्ह कोठे वापरले जाते याची माहिती घेऊन प्रत्येक उदाहरणांचे दोन-दोन वाक्य लिहा. 

वरील सर्व दोन वेळा आपल्या वहीत लिहून काढा. 

संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769

आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.

No comments:

Post a Comment