महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (MIEB)संलगन्ता प्राप्त शाळा जि.प.हायस्कुल मुलींचे मुखेड येथे पालक सभा संपन्न
दि.29/06/2019
वार - शनिवार
आज जि.प.हायस्कुल मुलींचे मुखेड येथे पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील पालकसभेचे
अध्यक्ष - म्हणुण शाळेचे मुख्याध्यापक श्री जि.सी.चव्हाण सर हे होते
प्रमुख पाहुणे -
*१)श्री भारती सर (ग.शि.अ.मुखेड)*
*२)पाटील सर (शि.वि.अ.मुखेड)*
*३)झंपलवाड सर (शि.वि.अ)*
*४)सौ.शारदाताई पाटील (महीला पालक प्रतिनिधी)*
*५)अँड.वि.जी.जाधव*
*६) श्री राजकुमार लाडगे(माजी नगरसेवक)*
*७)जयभीम सोनकांबळे(शा.व्य.स.ऊपाध्यक्ष )*
*८)श्री देवकांबळे सर (शिक्षक नेते)*
*९)मेहताब शेख,रियाज शेख,राजेंद्र धुळशेट्टे (पञकार बंधु )*
ई.प्रमुख पाहुणे म्हणुण ऊपस्थित होते.
*सुरवात*
पालक सभेची सुरवात पालकांच्या नोंदणीपासुन करण्यात आली व लगेच त्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर ऊपस्थित सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन व दिपप्रज्वलन करुन पालकसभेची सुरवात करण्यात आली.
*स्वागत* -
ऊपस्थित अध्यक्ष ,ऊपाध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुणे व पालक वर्ग यांचे शब्दरुपी पुष्पाने शाळेतील मुलींनी स्वागत केले.
*प्रस्तावना* -
सदरील पालक सभेचा ऊद्देश श्री डोईजड सर यांनी प्रास्ताविकेतुन करुन दिला.यामध्ये त्यांनी MIEB काय आहे?मातृभाषेतुन शिक्षणाचे फायदे,पालक सभा का घ्यावी? पालक सभेतील विषय व पालकांना MIEB अभ्यासक्रम कसा आहे ते सांगीतले.
*चर्चा पध्दतीने पालक सभा*-
त्यानंतर सर्व पालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व सर्व शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये चर्चा पध्दतीने पालक सभा खुप छान झाली.या चर्चेमध्ये पालक आपल्या समस्या सांगत होते व सर्व मान्यवर तसेच शिक्षक श्री तेहरा सर,दारकु सर,पालकांच्या शंका समाधान करत होते.यामध्ये पालकांच्या काही समस्या व प्रश्न आसे होते.
*MIEB मंडळ आहे तर कसे चालते?*
*अभ्यासक्रम कसा आहे?*
*गृहपाठ का नाही? आहे तर कसा असणार ?*
*पाठ्यपुस्तक कधी मिळणार?* *ते कशा स्वरूपात आहेत? विषय किती असणार?*
*आंतरराष्ट्रीय मंडळ म्हणताय मग मराठीत कसा अभ्यासक्रम ?*ईंग्रजी मध्ये का नाही विज्ञान व गणित?*
या व अशा आनेक प्रश्न पालकांनी विचारले या सर्व प्रश्नांची समाधानकारक ऊत्तरे पालकांना MIEB टिमकडून देण्यात आले.त्यामुळे सर्व पालक सभेदरम्यान सामाधान व्यक्त करत होते.व सर्वचजण अगदी ज्या शंका , समस्या घेऊन आले होते ते खुप समाधानी होऊन गेले.
तसेच *भारती सर गटशिक्षणाधिकारी मुखेड यांनी त्यांच्या मार्गदर्शनाने पालकांना मातृभाषेतुन शिक्षणाचे महत्व काय आहे? प्रत्येक मुल वेगळे असुन त्याला त्याच्यासारखे होऊ द्या ? आपल्या मुलाची तुलना ईतर मुलांसोबत करु नका.तो स्वतंत्र आहे तसेच शिक्षणातील विविध बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला*.
पालक सुद्धा समाधानी झाले.
*MIEB च्या शै.कार्यासाठी पालक सहभाग*-
*MIEB च्या पहील्याच मिटिंगमध्ये श्री साधु शिवराज गुरुबसप्पा यांच्यातर्फे (कु.संस्कृती शिवराज साधु वर्ग १ला) या पालकाने आमच्या शैक्षणिक कार्यासाठी व शाळेच्या विकासासाठी ५०००/-( पाच हजार रु ) निधी धनादेशाच्या स्वरूपात सर्व मान्यवर यांच्या ऊपस्थितीत शाळेचे मु.अ.श्री जि.सी.चव्हाण सर यांच्याकडे सुपुर्द केला.सर्व पालक वर्गासह मान्यवर यांनी त्यांचे स्वागत केले.*
त्यानंतर पालक सभेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने पालक सभा संपन्न झाली.
*ही पालक सभा यशस्वी करण्यासाठी MIEB टिमच्या प्रमुख स्वामी मँडम तसेच टाकळीकर मँडम ,लाटकर मँडम ,कुलकर्णी मँडम ,ऊमाटे मँडम,तेहरा सर ,दारकू* *सर,डोईजड सर,केँद्रे सर तसेच Lkg ukg MIEB टिमच्या सौ स्वामी मँडम,सौ चौव्हाण मँडम ,श्री सोनकांबवे सर यांनी परिश्रम घेतले.*
*पालक सभेचे सुञसंचालन श्री केँद्रे सर यांनी व आभार प्रदर्शन सौ ऊमाटे मँडम यांनी केले.*
*धन्यवाद !*
*शब्दांकन*
*श्री केँद्रे व्यंकटी संंतराम*
*सहशिक्षक*
*जि.प.हायस्कुल मुलींचे मुखेड*
9403162293

खुप छान उपक्रम सर अभिनंदन
ReplyDeleteस्तुत्य व अनुकरणीय कार्यक्रम असा उपक्रम प्रत्येक शाळेत राबवला जावा. शिक्षक प्रशासन व पालक एकत्र येऊन शाळेची प्रगती गतीने करता येते. आयोजकांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा.
ReplyDeleteVery nice sir, congratulations all of u
ReplyDelete