इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी
*Work From Home मराठी*
आलंकारिक शब्द व त्याचा अर्थ
०१) अतिशय झोपाळू - कुंभकर्ण
०२) मंद बुद्धीचा - गुळाचा गणपती
०३) अश्रू - गंगा यमुना
०४) चांगला सज्जन माणूस - देवमाणूस
०५) मोठे भांडण - खडाजंगी
०६) भेकड मनुष्य - दळूबाई
०७) घराबाहेर न पडणारा - घरकोंबडा
०८) निरर्थक बडबड - चर्पटपंजरी
०९) गरीब निरुपद्रवी मनुष्य - गोगलगाय
१०) मर्म, रहस्य - गुरुकिल्ली
११) जन्मापासून श्रीमंत - गर्भश्रीमंत
१२) निरक्षर, अडाणी - अक्षरशत्रू
१३) कळ लावणारा - कळीचा नारद
१४) हडकुळा - काडीपहिलवान
१५) मूर्ख - अकलेचा कांदा
१६) अतिशय दुर्मिळ योग - पर्वणी
१७) लांबत जाणारे काम - मारुतीचे शेपूट
१८) अचूक गुणकारी - रामबाण औषध
१९) कपटी मनुष्य - शकुनीमामा
२०) उशिरा उठणारा - सूर्यवंशी
वरील आलंकारिक शब्दांचे अर्थ समजून घेऊन प्रत्येक आलंकारिक शब्दांचे दोन वाक्य तयार करा.
वरील आलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ दोन वेळा आपल्या वहीत लिहून काढा.
संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769
ही पोस्ट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.
धन्यवाद ......!
सरजी उत्तम शालेय उपक्रम राबवत असल्याबद्दल आपले अभिनंदन
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDelete